1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही.…
1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)
मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वतःच्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले-खुपले, की ती कावरी-बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रुतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल.
(1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
[आकृती : वरच्या चौकटीत «आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी» असे लिहिले आहे; त्यातून चार बाण खालील चार रिकाम्या चौकटींकडे जातात.]
(2) कधी ते लिहा : (2)
(i) आई कावरीबावरी होते –
(ii) आई थकणार नाही –