Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (First Language) Board Paper March 2024

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2024, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग 1 : गद्य (प्र. 1) 3 questions
विभाग 2 : पद्य (प्र. 2) 3 questions
विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण) 3 questions
विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4) 7 questions
विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5) 8 questions

March 2024 SSC Marathi (First Language) board paper

This is the official Maharashtra State Board (MSBSHSE) SSC (Class 10) Marathi First Language (कुमारभारती) paper, printed as Marathi First Language – 01 (मराठी प्रथम भाषा – ०१), Revised Course, paper code N 501. It was written on 1 March 2024 at 11.00 a.m. (printed code 2024 III 01 – 1100).Source: the Maharashtra State Board's printed question paper (paper code N 501). The model answers are original Doubtly answers, not an official board answer key. This is not the Second/Third Language (अक्षरभारती) paper.

Paper pattern

It is a 3-hour paper for 80 marks (17 printed pages) in five sections: Section 1 prose (two textbook passages of 7 marks each and a 4-mark unseen passage, which is reused for the summary), Section 2 poetry (activities on the poem about Dr. Babasaheb Ambedkar, a table on ‘भरतवाक्य’ or ‘आश्वासक चित्र’ and a rasagrahan of lines from ‘वस्तू’), Section 3 extensive reading (any two of three tasks, 6 marks), Section 4 language study (samas, shabdasiddhi, vakprachar, word wealth, spelling, punctuation, technical terms) and Section 5 applied writing (letter or summary, any two of advertisement/news report/story, and one long piece: prasanglekhan, atmakathan or a thought essay). Activity diagrams must be drawn in pen.

How to use it

Write the paper by hand in three hours, then compare each answer with the model answers. Check your spelling against the लेखननियम answers and keep the writing tasks to a sensible length.

FAQs

Is this the official board paper?

Yes. The questions are from the board’s printed March 2024 paper (code N 501); only the answers are written by Doubtly.

Is this the Marathi Second Language paper?

No. This is the First Language (कुमारभारती) paper. The Second/Third Language (अक्षरभारती) paper has a different code and syllabus.

Why does Q.1 (आ)(3) say ‘दीपाली’?

The printed question names ‘सोनाली व दीपाली’, while the passage names Sonali’s companion as ‘रूपाली’. We have kept the question as printed and answered it about Sonali and Rupali.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग 1 : गद्य (प्र. 1)

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्यांचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो.

    (1) उत्तरे लिहा : (2)
    (i) म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार –
    (ii) आपल्या तरुण मुलाला ‘माणसं’ दाखवणारा –

    (2) आकृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : वर «वाट पाहण्याशी निगडित असलेल्या भावना» असे लिहिले आहे; त्याखालील आडव्या रेषेतून चार बाण खाली चार रिकाम्या जागांकडे जातात.]

    (3) स्वमत : (3)
    ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे.

    सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं.

    (1) कृती पूर्ण करा : (2)
    [आकृती : वरच्या चौकटीत «सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खालील दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]

    (2) कोण ते लिहा : (2)
    (i) सोनालीवर ताईगिरी करणारी –
    (ii) झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी –

    (3) स्वमत : (3)
    सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा. (टीप : प्रश्नपत्रिकेत ‘दीपाली’ असेच छापले आहे; उताऱ्यात सोनालीच्या सोबतिणीचे नाव ‘रूपाली’ आहे.)

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)

    मातेचा महिमा मी किती सांगू, किती गाऊ ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वतःच्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले-खुपले, की ती कावरी-बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रुतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल.

    (1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
    [आकृती : वरच्या चौकटीत «आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी» असे लिहिले आहे; त्यातून चार बाण खालील चार रिकाम्या चौकटींकडे जातात.]

    (2) कधी ते लिहा : (2)
    (i) आई कावरीबावरी होते –
    (ii) आई थकणार नाही –

    4 marks See answer →

विभाग 2 : पद्य (प्र. 2)

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    (1) (अ) चौकटी पूर्ण करा : (2)
    (i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – [ ]
    (ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – [ ]

    तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
    सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
    मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
    खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

    तू झालास परिस्थितीवर स्वार
    आणि घडविलास नवा इतिहास
    तू झालास मूक समाजाचा नायक
    आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

    तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
    तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
    आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
    युद्धात जवानांना उभे करावे तसे.

    तुझे शब्द जसे की
    महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
    तुझा संघर्ष असा की
    काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.

    तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
    आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

    आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
    सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
    बिगूल प्रतीक्षा करतोय
    चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

    (2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
    [आकृती : वरच्या चौकटीत «डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य» असे लिहिले आहे; त्यातून चार बाण खालील चार रिकाम्या चौकटींकडे जातात.]

    (3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
    तू झालास परिस्थितीवर स्वार
    आणि घडविलास नवा इतिहास

    (4) काव्यसौंदर्य : (2)
    ‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
    सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
    बिगूल प्रतीक्षा करतोय
    चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय’.
    या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)

    भरतवाक्य ← किंवा → आश्वासक चित्र
    (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.................. (1)
    (ii) प्रस्तुत कवितेचा विषय.................. (1)
    (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे.................. (2)
    4 marks See answer →
  3. 2. (इ) खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा : (4 गुण)

    ‘वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
    असल्यासारखे वागलो तर वस्तू
    प्रचंड सुखावतात’.

    4 marks See answer →

विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण)

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (6 गुण)

    (1) ‘माणसे पेरा। माणुसकी उगवेल’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

    3 marks See answer →
  2. 3. (2) ‘पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.

    3 marks See answer →
  3. 3. (3) व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.

    3 marks See answer →

विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4)

  1. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

    (1) समास : योग्य जोड्या लावा : (2)

    सामासिक शब्दसमासाचे नाव
    (i) त्रिभुवनकर्मधारय समास
    (ii) पुरुषोत्तमद्विगू समास
    इतरेतर द्वंद्व समास
    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) शब्दसिद्धी : खाली दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा : (2)

    (बिनचूक, जमीनदार, तीळतीळ, आंबटचिंबट)

    प्रत्ययघटित शब्दउपसर्गघटित शब्दअभ्यस्त शब्द
    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा : (4)

    (i) कंठस्नान घालणे
    (ii) हुकमत गाजवणे
    (iii) व्यथित होणे
    (iv) आनंद गगनात न मावणे.

    4 marks See answer →
  4. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

    (1) शब्दसंपत्ती :

    (1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (1)
    (i) मार्ग =
    (ii) जल =

    (2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
    (i) सुपीक ×
    (ii) ज्ञानी ×

    (3) खालील शब्दांचे वचन बदला : (1)
    (i) भिंती
    (ii) रस्ता

    (4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
    रखवालदार

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. (कोणतीही दोन वाक्ये सोडवा) : (2)

    (i) महर्षि कर्वे यांजमध्ये स्थीतप्रज्ञाची लक्षणे होती.
    (ii) पावसाळ्यात दीशा धुसर झालेल्या असतात.
    (iii) महाराष्ट्र हि संतांची भुमी आहे.
    (iv) शनीवारी दूपारी साडेबाराची वेळ होती.

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) खालील विरामचिन्हे ओळखा : (1)

    (i) ,..................
    (ii) “ ”..................
  7. 4. (आ) (4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (1)

    (i) Tax –
    (ii) Exhibition –

विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5)

  1. 5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

    ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे’

    आम्रपाली रोपवाटिका
    यशवंतनगर, सांगली

    एक सुंदर उपक्रम व स्पर्धा

    रोपे वाटप : १५ जून ते २० जून
    वेळ : सकाळी ९ ते सायं ५

    फक्त शालेय संस्थांसाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप
    सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्यास बक्षीस

    संपर्क – व्यवस्थापक – Email-amrapali06@gmail.com

    मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

    (i) वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

    किंवा

    (ii) उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    किंवा विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

    (1) जाहिरातलेखन : संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. (5 गुण)

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) बातमीलेखन : खालील विषयावर बातमी तयार करा : (5 गुण)

    ‘ज्ञानज्योत विद्यालय’, वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा : (5 गुण)

    (दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)

    कथा : शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि..........................

    5 marks See answer →
  6. 5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन :

    साधना विद्यालय, धुळे
    इयत्ता दहावी-शुभेच्छा समारंभ
    दि. ४ फेब्रुवारी    स. १० वाजता
    अध्यक्ष – श्री. रमाकांत धुमाळ
    प्रमुख पाहुणे – श्री. अजय साठे

    वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. (8 गुण)

    [आकृती : मध्यभागी चौकटीत «आरसा» असे लिहिले आहे; त्याभोवती चार मुद्दे दिले आहेत – वर «शोध/निर्मिती», उजवीकडे «आनंदाचे क्षण», खाली «गरज व महत्त्व», डावीकडे «खंत».]

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक लेखन : (8 गुण)

    ‘जलप्रदूषण–समस्या व उपाय’ या विषयावर तुमचे विचार लिहा.

    8 marks See answer →