2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)(1) (अ) चौकटी पूर्ण करा : (2)(i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – [ ](ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – [ ]तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.…
2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)
(1) (अ) चौकटी पूर्ण करा : (2)
(i) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – [ ]
(ii) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – [ ]
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.
(2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
[आकृती : वरच्या चौकटीत «डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य» असे लिहिले आहे; त्यातून चार बाण खालील चार रिकाम्या चौकटींकडे जातात.]
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
(4) काव्यसौंदर्य : (2)
‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय’.
या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.