1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो आणि शारीरिकच काय, पण मानसिक आधारासाठीसुद्धा हातात हात लागतो. एखाद्या व्यक्तीचा हात…
1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)
शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो आणि शारीरिकच काय, पण मानसिक आधारासाठीसुद्धा हातात हात लागतो. एखाद्या व्यक्तीचा हात हातात घेण्याने काही आठवणी जाग्या होत असतात. आजीच्या अंगाखांद्यावर खेळलेली नातवंडं मोठी झाल्यावर जेव्हा आजीचा हात हातात घेतात, तेव्हा कवी बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर’ अशीच तिची अवस्था होत असेल.
कोऱ्या वह्या-पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मऊ हिरवळीचा अनवाणी पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श, धबधब्याच्या थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श असे कितीतरी आनंददायक स्पर्श मनात रेंगाळत राहतात. या आठवणींच्या अत्तराची मनात दडवून ठेवलेली कुपी हलकेच उघडते आणि मनभर सुगंध दरवळतो.
(1) चौकटी पूर्ण करा : (2)
(i) शब्दांच्या पलीकडची भाषा – [ ]
(ii) उताऱ्यात आलेले कवीचे नाव – [ ]
(2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
मनात रेंगाळणारे आनंददायक स्पर्श → [ ] [ ] [ ] [ ]