Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (Second/Third Language) Board Paper March 2026

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2026, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग 1 : गद्य (प्र. 1) 3 questions
विभाग 2 : पद्य (प्र. 2) 2 questions
विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण) 3 questions
विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4) 6 questions
विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5) 8 questions

March 2026 SSC Marathi Second/Third Language (अक्षरभारती) board paper

This is the Marathi Second or Third Language paper (Marathi 16, textbook अक्षरभारती), not the First Language paper. It is the Maharashtra State Board (MSBSHSE) SSC question paper of the February–March 2026 examination, paper code N 871 (“MARATHI (16) (SECOND OR THIRD LANGUAGE) (M), Revised Course”), written on 23 February 2026, 11.00 a.m. The questions are transcribed from the board’s printed question paper (15 pages). Source: the Maharashtra State Board's printed question paper (paper code N 871). Every model answer is an original Doubtly answer, not the board’s answer key. If you study Marathi as your First Language (कुमारभारती, Marathi 01), use our First Language board papers instead.

Paper pattern

Time 3 hours, maximum 80 marks, five sections. विभाग 1 गद्य (18 marks): activities on two textbook passages (‘उपास’ and ‘ऊर्जाशक्तीचा जागर’) and an unseen passage. विभाग 2 पद्य (16 marks): activities on संत नामदेवांचा अभंग ‘अंकिला मी दास तुझा’, and a points table on any one of ‘रंग मजेचे रंग उद्याचे’ or ‘औक्षण’. विभाग 3 स्थूलवाचन (6 marks): any two of three. विभाग 4 भाषाभ्यास (16 marks): sentence types, sentence transformation, वाक्प्रचार, word wealth, spelling rules and punctuation. विभाग 5 उपयोजित लेखन (24 marks): letter or summary (6), any two of advertisement, news report and story (10), and one long piece (8). In the scan the mark for row (5) of Q.2 (आ) is cut off at the page edge; it is 2 marks, which brings the paper to 80.

How to use it

Write the paper in one 3-hour sitting, drawing the आकृती/आकृतिबंध in pen as the instructions say. Then compare with the model answers. For स्वमत, काव्यसौंदर्य and writing tasks our answer is one good sample; any well-argued answer in correct Marathi earns marks. Where the paper offers a choice we have answered every option so that you can practise all of them.

FAQs

Is this the First Language Marathi paper?

No. This is the Second/Third Language paper (Marathi 16, अक्षरभारती). The First Language paper (कुमारभारती) for March 2026 had the code N 801 and different lessons.

Are these the board’s official answers?

No. The questions are the board’s; the answers are written by Doubtly to show how a good student would answer.

One sentence on page 10 of the scan is faint. How was it read?

Page 10 of the scan is very light and low-resolution, so it was read with contrast enhancement. Q.4 (अ) (3) gives ‘तथ्य असणे’, ‘उत्साहाला उधाण येणे’ and ‘ऋण असणे’ (any two, 4 marks), and each of the four items of Q.4 (आ) (1) carries 1 mark. In Q.4 (अ) (2) (ii) the first word cannot be read with certainty (it may be printed ‘ती’); we give the sentence as ‘तो देखावा खूप सुंदर आहे.’ because देखावा is masculine. The answer is the same either way.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग 1 : गद्य (प्र. 1)

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण ‘उपास’ हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

    “हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.”

    “पण.........मी हे मुद्दाम केलं नाही, आचार्य! अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.”

    “काही उपयोग होणार नाही!”

    “का ?”

    “का म्हणजे ? जिभेवर ताबा नाही तुमचा. संयम हवा. मनाची एकाग्रता हवी. त्यास प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील.”

    (1) कारणे लिहा : (2)

    (i) पंतांची पहिली उडीच शेवटची ठरली, कारण ..................

    (ii) आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही समाचाराला आले नाहीत, कारण ..................

    (2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

    दोरीवरील उड्यांचे झालेले परिणाम → [ ] [ ]

    (3) स्वमत : (3)

    दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हांला समजलेला विनोद स्पष्ट करा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता ?” हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या.

    “अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ ?”

    (1) कोण ते लिहा : (2)

    (i) रेखामावशींना दार उघडणारा ..................

    (ii) स्वच्छतेची भोक्ती असलेली ..................

    (2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

    रेखामावशींच्या पायाला धूळ लागण्याची कारणे → [ ] [ ]

    (3) स्वमत : (3)

    ‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)

    शब्दांच्या पलीकडे जाऊन स्पर्शाची भाषा बोलते. म्हणूनच आपल्याला रडण्यासाठी जिवलग व्यक्तीचा खांदा लागतो आणि शारीरिकच काय, पण मानसिक आधारासाठीसुद्धा हातात हात लागतो. एखाद्या व्यक्तीचा हात हातात घेण्याने काही आठवणी जाग्या होत असतात. आजीच्या अंगाखांद्यावर खेळलेली नातवंडं मोठी झाल्यावर जेव्हा आजीचा हात हातात घेतात, तेव्हा कवी बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘ती म्हातारी थरथर कापे सुखासवे होऊन अनावर’ अशीच तिची अवस्था होत असेल.

    कोऱ्या वह्या-पुस्तकांचा स्पर्श, तलम साडीचा स्पर्श, मऊ हिरवळीचा अनवाणी पायांना होणारा लुसलुशीत स्पर्श, धबधब्याच्या थंडगार पाण्याच्या माऱ्याचा स्पर्श असे कितीतरी आनंददायक स्पर्श मनात रेंगाळत राहतात. या आठवणींच्या अत्तराची मनात दडवून ठेवलेली कुपी हलकेच उघडते आणि मनभर सुगंध दरवळतो.

    (1) चौकटी पूर्ण करा : (2)

    (i) शब्दांच्या पलीकडची भाषा – [ ]

    (ii) उताऱ्यात आलेले कवीचे नाव – [ ]

    (2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

    मनात रेंगाळणारे आनंददायक स्पर्श → [ ] [ ] [ ] [ ]

    4 marks See answer →

विभाग 2 : पद्य (प्र. 2)

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    अग्निमाजि पडे बाळू ।
    माता धांवें कनवाळू ॥१॥
    तैसा धांवें माझिया काजा ।
    अंकिला मी दास तुझा ॥२॥
    सवेंचि झेंपावें पक्षिणी ।
    पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥
    भुकेलें वत्सरावें ।
    धेनु हुंबरत धांवे ॥४॥
    वणवा लागलासे वनीं ।
    पाडस चिंतीत हरणी ॥५॥
    नामा म्हणे मेघा जैसा ।
    विनवितो चातक तैसा ॥६॥

    (1) कोण ते लिहा : (2)

    (i) परमेश्वराचे दास –

    (ii) मेघाला विनवणी करणारा –

    (2) आकृती पूर्ण करा : (2)

    कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द : माता → [ ] ; हरिणी → [ ]

    (3) पुढील शब्दांचे अर्थ लिहा : (2)

    (i) धेनू – (ii) काज – (iii) अंकिला – (iv) सवें –

    (4) काव्यसौंदर्य : (2)

    संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा : (8 गुण)

    मुद्देरंग मजेचे रंग उद्याचे ← किंवा → औक्षण
    (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री(1 गुण)
    (2) कवितेचा विषय(1 गुण)
    (3) कवितेतून मिळणारा संदेश(2 गुण)
    (4) सरळ अर्थ लिहा.‘धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू.’ ← किंवा → ‘अशा असंख्य ज्योतींची तुझ्यामागून राखण’. (2 गुण)
    (5) कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण(2 गुण)
    8 marks See answer →

विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण)

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती करा : (6 गुण)

    (1) ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.

    3 marks See answer →
  2. 3. (2) ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीची यथार्थता ‘मोठे होत असलेल्या मुलांनो’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

    3 marks See answer →
  3. 3. (3) टीप लिहा : व्युत्पत्ती कोशाचे कार्य

    3 marks See answer →

विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4)

  1. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

    (1) खालील वाक्याचा प्रकार ओळखा : (2)

    (i) तुला चित्र काढायला आवडते का ?

    (ii) भारत माझा देश आहे.

    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा : (2)

    (i) नेहमी खरे बोलावे. (आज्ञार्थी करा)

    (ii) तो देखावा खूप सुंदर आहे. (उद्गारार्थी करा)

    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन) : (4)

    (i) तथ्य असणे (ii) उत्साहाला उधाण येणे (iii) ऋण असणे

    4 marks See answer →
  4. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

    (1) शब्दसंपत्ती :

    (1) समानार्थी शब्द लिहा : (i) दिवस – (ii) नदी – (1)

    (2) विरुद्धार्थी शब्द लिहा : (i) विश्वास – (ii) सुंदर – (1)

    (3) वचन बदला : (i) पाऊल – (ii) गाडी – (1)

    (4) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : कविता करणारा – (1)

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा : (2)

    (i) आमचे मुळ गाव दक्षीण गोव्यातील माशेल.

    (ii) वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) विरामचिन्हे : खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा : (2)

    (i) “पंत फरक दिसतो हं”

    (ii) “बाबा तुम्ही मला ओळखले”

    2 marks See answer →

विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5)

  1. 5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.

    चला, हस्ताक्षर सुंदर करुया!
    ज्ञानमंदिर संस्था, धुळे
    आयोजित
    ‘सुंदर हस्ताक्षर वर्ग’
    1 जून ते 10 जून
    शालेय विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
    संपर्क – व्यवस्थापक, ज्ञानमंदिर संस्था, आधारकर मार्ग, धुळे.
    dnyanmandir70@gmail.com

    कु. योगेश/युगंधरा भावे, विद्यार्थी प्रतिनिधी, साधना विद्यालय, धुळे या नात्याने

    (i) हस्ताक्षर वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र लिहा. किंवा (ii) हस्ताक्षर वर्गाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग 1 – गद्य (इ) (प्र. क्र. 1 इ.) मधील अपठित उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

    (1) जाहिरातलेखन : खालील शब्दांचा उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा.

    संगणक वर्ग – काळाची गरज – तज्ज्ञ मार्गदर्शक – कालावधी (सोबत QR कोडचे चिन्ह)

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.

    अभिनव विद्यामंदिर
    ‘मराठी भाषा दिन’
    27 फेब्रुवारी
    ‘कवितावाचन, बालनाट्य, गीतगायन असा रंगतदार कार्यक्रम.’

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा :

    एक खोडकर मुलगा – गुरे राखण्यास रानात जाणे – अनेक खोड्या – एक दिवस ‘लांडगा आला रे आला’ असे ओरडणे – लोक काठ्या घेऊन धावत येणे – मुलगा हसत सुटणे – असे अनेक वेळा करणे – एक दिवस खरा लांडगा येणे – ओरडणे – कोणीही मदतीला न येणे – नुकसान – तात्पर्य.

    5 marks See answer →
  6. 5. (इ) लेखनकौशल्य : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन : दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील विषयावर प्रसंगलेखन करा.

    ‘मी पाहिलेले प्रदर्शन’ – मुद्दे : प्रदर्शनाचा प्रकार, ठिकाण, आवडलेल्या गोष्टी, अविस्मरणीय अनुभव.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

    ‘छत्री’ – मुद्दे : रंग, रूप, प्रकार; उपयुक्तता; काळानुरूप झालेले बदल; मनातील खंत.

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक : दिलेल्या विषयावर तुमचे विचार मांडा.

    ‘अंधश्रद्धा – एक शाप’

    8 marks See answer →