Answer: तथ्य असणे – सत्यता असणे; उत्साहाला उधाण येणे – खूप आनंद होणे; ऋण असणे – उपकार असणे.
(i) तथ्य असणे – सत्यता असणे, खरेपणा असणे.
वाक्य : चौकशीत सायलीच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सिद्ध झाले.
(ii) उत्साहाला उधाण येणे – खूप आनंद होणे, अतिशय उत्साह वाटणे.
वाक्य : सहलीची घोषणा होताच वर्गातील मुलांच्या उत्साहाला उधाण आले.
(iii) ऋण असणे – उपकार असणे, एखाद्याच्या उपकाराखाली असणे.
वाक्य : मला घडवणाऱ्या शिक्षकांचे माझ्यावर कायमचे ऋण आहे.
(कोणतेही दोन लिहिणे पुरेसे आहे.)