Answer: अंगाचा तिळपापड होणे – खूप राग येणे; आर्जव करणे – कळकळीने विनंती करणे; गलका करणे – मोठ्याने गोंगाट करणे.
(i) अंगाचा तिळपापड होणे – खूप राग येणे.
वाक्य : आपल्या नवीन सायकलवर ओरखडे पाहून अमितच्या अंगाचा तिळपापड झाला.
(ii) आर्जव करणे – कळकळीने विनंती करणे, विनवणी करणे.
वाक्य : सहलीला जाऊ द्यावे म्हणून राधाने आईकडे खूप आर्जव केले.
(iii) गलका करणे – मोठ्याने गोंगाट करणे.
वाक्य : शिक्षक वर्गात नसताना मुलांनी गलका केला.
(कोणतेही दोन लिहिणे पुरेसे आहे.)