Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (Second/Third Language) Board Paper March 2025

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2025, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग 1 : गद्य (प्र. 1) 3 questions
विभाग 2 : पद्य (प्र. 2) 2 questions
विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण) 3 questions
विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4) 6 questions
विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5) 8 questions

March 2025 SSC Marathi Second/Third Language (अक्षरभारती) board paper

This is the Marathi Second or Third Language paper (Marathi 16, textbook अक्षरभारती), not the First Language paper. It is the Maharashtra State Board (MSBSHSE) SSC question paper of the February–March 2025 examination, paper code N 771 (“MARATHI (16) (SECOND OR THIRD LANGUAGE) (M), Revised Course”), written on 24 February 2025, 11.00 a.m. The questions are transcribed from the board’s printed question paper (16 pages). Source: the Maharashtra State Board's printed question paper (paper code N 771). Every model answer is an original Doubtly answer, not the board’s answer key. If you study Marathi as your First Language (कुमारभारती, Marathi 01), use our First Language board papers instead.

Paper pattern

Time 3 hours, maximum 80 marks, five sections. विभाग 1 गद्य (18 marks): activities on ‘बीज पेरले गेले’, ‘खरा नागरिक’ and an unseen passage. विभाग 2 पद्य (16 marks): activities on नारायण सुर्वे यांची ‘दोन दिवस’, and a points table on any one of ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ or ‘औक्षण’. विभाग 3 स्थूलवाचन (6 marks): any two of three. विभाग 4 भाषाभ्यास (16 marks): sentence types, transformation, वाक्प्रचार, word wealth, spelling rules and punctuation marks. विभाग 5 उपयोजित लेखन (24 marks): letter or summary (6), any two of advertisement, news report and story (10), and one long piece of 100–120 words (8).

How to use it

Write the paper in one 3-hour sitting, drawing the आकृती in pen, and then check against the model answers. For स्वमत, काव्यसौंदर्य and writing tasks our answer is one good sample; any well-argued answer in correct Marathi earns marks. Where the paper offers a choice we have answered every option so that you can practise all of them.

FAQs

Is this the First Language Marathi paper?

No. This is the Second/Third Language paper (Marathi 16, अक्षरभारती). The First Language paper (कुमारभारती) for March 2025 had the code N 701.

Are these the board’s official answers?

No. The questions are the board’s; the answers are written by Doubtly to show how a good student would answer.

Is the July 2025 supplementary paper included?

No. We could not find a complete copy of the board’s printed July 2025 Marathi Second/Third Language paper, so it is not included.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग 1 : गद्य (प्र. 1)

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    (1) आकृती पूर्ण करा : (2)

    लेखकाचा बालपणीचा दिनक्रम → [ ] [ ] [ ] [ ]

    माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो! माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतून बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा.

    (2) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा : (2)

    (i) दिवसभराच्या खेळाने लेखकाला भूक तर खूपच लागलेली असायची–

    (ii) लेखकाचा जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झाला–

    (iii) लेखकाचे वडील बँकेमध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते–

    (iv) लेखक लहानपणी खोडकर होते–

    (3) स्वमत : (3)

    तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    (1) आकृती पूर्ण करा : (2)

    दाजीसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये → [ ] [ ] [ ] [ ]

    सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला, चौऱ्याऐंशी वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेज:पुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरेस्वच्छ धोतर व त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते –

    “रामानं सेतुबंधन केलं; पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार; तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हांला सुदैवाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि जेष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली; पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. अब्दुलमियाँनी मात्र स्वत:हून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुलमियाँ इथं येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले दोन दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुलमियाँ न बोलावता दरवर्षी येतात. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात.”

    (2) चौकटी पूर्ण करा : (2)

    (i) उताऱ्यात आलेले सणाचे नाव – [ ]

    (ii) रामाला सेतुबंधनासाठी मदत करणारी – [ ]

    (3) स्वमत : (3)

    ‘तपोवनात जाऊन अब्दुलने केलेली समाजसेवा’, याविषयी तुमचे विचार लिहा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (4 गुण)

    (1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

    निसर्गाने भागवलेल्या मानवी गरजा → [ ] , वस्त्र , [ ]

    निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू. निसर्गातील प्रत्येक घटकापासून माणूस खूप काही शिकला आहे, शिकत आहे व पुढेही शिकू शकतो. तसं पाहिलं तर निसर्ग गुरूपेक्षा माणसाचा मित्र मानला पाहिजे असे एक मतही अगदी आग्रहाने मांडले जाते. माणसाच्या अगदी प्रारंभीच्या काळात खरी साथ दिली ती निसर्गाने. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा निसर्गाने भागविल्या. त्याचबरोबर प्रगतीसाठी आवश्यक ती साथही दिली. शेती, शिकार तसेच उपजीविकेसाठी, गरजा भागवण्यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य निसर्गाद्वारेच मिळत गेले.

    निसर्ग माणसाला भरभरून देत राहिला, त्याचबरोबर माणूसही त्या काळात निसर्गाचा ऋणीच राहिला. पण कालांतराने माणसाच्या आशा वाढत गेल्या, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला, त्याचबरोबर निसर्गाच्या प्रती असलेली ही भावना कमी होत गेली.

    (2) कारणे लिहा : (2)

    माणसाची निसर्गाच्या प्रती ऋणी असण्याची भावना कालांतराने कमी होत गेली, कारण (i) .......... (ii) ..........

    4 marks See answer →

विभाग 2 : पद्य (प्र. 2)

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    (1) चौकटी पूर्ण करा : (2)

    (i) कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट – [ ]

    (ii) कवीचा जवळचा मित्र – [ ]

    दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
    हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
    शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
    भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

    हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
    कधी माना उंचावलेले, तर कधी कलम झालेले पाहिले
    हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
    तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

    दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
    दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
    झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
    दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दिवस दु:खात गेले.

    (2) खालील आशयाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा : (2)

    (i) ‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेले.’

    (ii) कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद.

    (3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा : (2)

    (i) डोईवर – (ii) दारिद्र्य – (iii) हरघडी – (iv) पोलाद –

    (4) काव्यसौंदर्य : (2)

    कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील दोन कवितांपैकी एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा : (8 गुण)

    मुद्देयोगी सर्वकाळ सुखदाता ← किंवा → औक्षण
    (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री(1 गुण)
    (2) कवितेचा विषय(1 गुण)
    (3) पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा.‘जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।’ ← किंवा → ‘नाही मुठीमधे द्रव्य / नाही शिरेमध्ये रक्त, / काय करावे कळेना / नाही कष्टाचे सामर्थ्य.’ (2 गुण)
    (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण(2 गुण)
    (5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.(i) जीवन (ii) मेघ (iii) निर्मळ (iv) रसना ← किंवा → (i) औक्षण (ii) द्रव्य (iii) कल्लोळ (iv) शौर्य (2 गुण)
    8 marks See answer →

विभाग 3 : स्थूलवाचन (प्र. 3 – कोणत्याही दोन कृती, 6 गुण)

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (6 गुण)

    (1) टीप लिहा – बार्क

    3 marks See answer →
  2. 3. (2) ‘थोड्याश्या पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.

    3 marks See answer →
  3. 3. (3) ‘जाता अस्ताला’ या कवितेतील सूर्य आणि पणती या प्रतीकांचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.

    3 marks See answer →

विभाग 4 : भाषाभ्यास (प्र. 4)

  1. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

    (1) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा : (2)

    (i) सुश्रुत, ओळखलंस मला ?

    (ii) सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते.

    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा : (2)

    (i) प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)

    (ii) केवढी मोठी वसाहत आहे ही! (विधानार्थी करा.)

    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा (कोणतेही दोन) : (4)

    (i) अंगाचा तिळपापड होणे – (ii) आर्जव करणे – (iii) गलका करणे –

    4 marks See answer →
  4. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

    (1) शब्दसंपत्ती :

    (1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा : (i) रस्ता – (ii) शाळा – (1)

    (2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (i) इकडे – (ii) निंदा – (1)

    (3) वचन बदला : (i) शहर – (ii) गाडी – (1)

    (4) लिंग बदला : (i) लेखक – (ii) घोडा – (1)

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : खालील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा : (2)

    (i) रेखामावशिंची पावलं अधिक सूंदर आहेत.

    (ii) लींबाचा रस तर मला अमृतासारखा वाटु लागला.

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) विरामचिन्हे : चौकटीत दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा : (2)

    (i) [ ! ] – (ii) [ ? ] – (iii) [ , ] – (iv) [ “.....” ] –

    2 marks See answer →

विभाग 5 : उपयोजित लेखन (प्र. 5)

  1. 5. (अ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन :

    जागृती युवा प्रबोधिनी, काष्टी
    आयोजित
    विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा
    दिनांक – 10 जानेवारी    वेळ – स. 7.00
    आकर्षक पारितोषिके
    नावनोंदणी सुरू
    वयोगट – 10 ते 15 वर्षे
    संपर्क – श्री. सोहम शिरगावकर, आयोजक, मॅरेथॉन स्पर्धा.
    ई-मेल – jagyuva04@gmail.com

    ईशान/इरा रेगे, विद्यार्थी प्रतिनिधी, (आनंदक्षण विद्यालय, काष्टी) या नात्याने

    (i) प्रस्तुत स्पर्धेकरिता शाळेतील वीस विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा. किंवा (ii) प्रस्तुत स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल अभिनंदन करणारे पत्र आयोजकांना लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग 1 – गद्य (इ) (प्रश्न क्र. 1-इ) मधील अपठित उताऱ्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

    (1) जाहिरातलेखन : शालेय साहित्याच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा.

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) बातमीलेखन : माध्यमिक विद्यालय, वाई येथे 14 नोव्हेंबर रोजी ‘बालदिन’ साजरा झाला, या कार्यक्रमाची बातमी तयार करा.

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा :

    मुद्दे : एक राजा – आळशी प्रजा – राजाची उपाययोजना – रस्त्यावर मधोमध दगड ठेवण्याची आज्ञा देणे – लोकांनी दगड पाहणे व कडेने जाणे – जबाबदार नागरिकाने दगड बाजूला करणे – धनाची पेटी सापडणे – राजाकडे नेऊन देणे – राजा आनंदी – प्रजेसमोर जबाबदार नागरिकाचा सत्कार – प्रजेस योग्य बोध होणे.

    5 marks See answer →
  6. 5. (इ) लेखनकौशल्य (100 ते 120 शब्द) : खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन :

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
    भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम
    ज्ञानसागर विद्यालय, सांगली
    दि. 5 जून    वेळ – सकाळी – 8.00
    प्रमुख पाहुणे – वृक्षमित्र श्री. अनिल रॉय
    अध्यक्ष – श्रीमती रेखा घाटे

    वरील समारंभास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : मुद्दे : निर्मिती, प्रकार; महत्त्व, उपयोग; आनंदाचे क्षण; खंत. वरील मुद्द्यांच्या आधारे ‘छत्री’ या घटकाचे आत्मकथन लिहा.

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक : ‘वीजबचत : काळाची गरज’, या विषयावर तुमचे विचार लिहा.

    8 marks See answer →