(a) अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक: (1) अभिक्रियाकारकांचे स्वरूप, (2) अभिक्रियाकारकांच्या कणांचे आकारमान, (3) अभिक्रियाकारकांची संहती, (4) अभिक्रियेचे तापमान, (5) उत्प्रेरक.
(b) तापमान: तापमान वाढवल्यास अभिक्रियाकारकांच्या रेणूंची गतिज ऊर्जा वाढते. त्यामुळे रेणूंमधील टकरी वाढतात आणि जुने बंध तुटण्यासाठी आवश्यक ऊर्जा असणाऱ्या रेणूंची संख्या वाढते, म्हणून अभिक्रिया जलद होते. उदा. सामान्य तापमानापेक्षा प्रेशर कुकरमध्ये (जास्त तापमानाला) अन्न लवकर शिजते; उन्हाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होतात, तर फ्रिजमध्ये (कमी तापमानाला) ते जास्त काळ टिकतात.