Chapter: Chemical Reactions and Equations· Science & Technology Part 1
उत्तर: रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक:
- अभिक्रियाकारकांचे स्वरूप
- अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार
- अभिक्रियाकारकांची संहती
- अभिक्रियेचे तापमान
- उत्प्रेरक
तापमान: तापमान वाढवल्यास अभिक्रियाकारकांच्या रेणूंची गतिज ऊर्जा वाढते. त्यामुळे रेणूंच्या टकरा अधिक वेळा व अधिक ऊर्जेने होतात आणि जास्त टकरांमध्ये अभिक्रियाकारकांतील बंध तुटण्याइतकी ऊर्जा असते. म्हणून तापमान वाढल्यास अभिक्रियेचा दर वाढतो. उदा. मोठ्या आचेवर अन्न लवकर शिजते, तर दूध फ्रीजमध्ये ठेवल्यास (कमी तापमानात) ते लवकर नासत नाही.