Skip to content
doubtly

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोण…

1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे, ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’ अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड.’ रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

“दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.

(1) उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा. (2)
(i) ..................
(ii) ..................

(2) आकृतिबंध पूर्ण करा : (2)
(i) कार्डवर दाखवलेले वजन : – [ ]
(ii) [आकृती : वरच्या चौकटीत «लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द» असे लिहिले आहे; त्यातून दोन बाण खाली दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]

(3) स्वमत : (3)
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

1 answer

Best answer

Answer:

(1) (i) ही माझी ‘नाही ती भानगड’ आहे, उगीच ‘हात दाखवून अवलक्षण’ आहे.
(ii) ‘पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!’

(2) (i) कार्डवर दाखवलेले वजन : एकशे एक्क्याऐंशी पौंड.
(ii) लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द : (1) प्रोटीनयुक्त पदार्थ (2) चरबीयुक्त द्रव्ये.

(3) स्वमत : वजनकाट्याच्या कार्डवर ‘एकशे एक्क्याऐंशी पौंड’ हे वजन पाहिल्यावर लेखक अस्वस्थ झाले. त्यांनी स्वतःशीच खाजगी उपोषण सुरू केले. चाळीतील लोकांनी त्यांची थट्टा केली, तरी त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष केले. ‘दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन’ अशी कठोर प्रतिज्ञाच त्यांनी केली. त्यासाठी ते आहारशास्त्रावरची पुस्तके वाचू लागले आणि प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये यांचा अभ्यास करू लागले. जेवताना ताटातील पदार्थांऐवजी ते त्यातील कॅलरीजचाच हिशोब करू लागले. झोप कमी झाली तरी वजन उतरेल म्हणून त्यांनी त्याचीही पर्वा केली नाही. अशा प्रकारे लेखकाने खाण्यावर नियंत्रण, आहाराचे ज्ञान आणि जिद्द या मार्गांनी वजन कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

Doubtly AI · 27 Oct 2026 AI-generated · not yet verified Report
Was this answer helpful?

Your answer

Log in or create a free account to answer this question.