कृती १. (इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४ गुण)(१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख : (२)(य) [ ](र) [ ]छोटेसे का होईना पण स्वत:चे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांन…
कृती १. (इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४ गुण)
(१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख : (२)
(य) [ ]
(र) [ ]
छोटेसे का होईना पण स्वत:चे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो.
अर्थात हे भाग्य असेतसे आले नव्हते. बंगल्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी मी निरनिराळ्या ठिकाणांहून इतकी कर्जे काढली होती की, जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे वा कॉम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. असे असूनही, आणखी एक कर्ज काढून मी दणक्यात वास्तुशांत केली अन् बंगल्यात राहायला गेलो. आसपास थोडीफार वस्ती होऊ घातली असली तरी माझा बंगला त्या माळरानावर ओकाबोकाच वाटत होता. बंगल्याच्या आवारातच काय, पण बाहेर एकही झाड नव्हते ना झुडूप होते. सोयी गैरसोयीही बऱ्याच होत्या, तरी सुद्धा ..... इट वॉज माय स्वीट ..... स्वीट होम!
— अविनाश हळबे.
(२) लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले – (२)
कारण ..................