Skip to content
doubtly

Maharashtra HSC Marathi (Yuvakbharati) Board Paper March 2026 with Answers

Written board papers. Physics and Chemistry: 70 marks, 3 hours. Mathematics & Statistics: 80 marks, 3 hours.

2026, March 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग १ : गद्य (कृती १, २० गुण) 3 questions
विभाग २ : पद्य (कृती २, १६ गुण) 3 questions
विभाग ३ : साहित्यप्रकार – कथा (कृती ३, १० गुण) 2 questions
विभाग ४ : उपयोजित मराठी (कृती ४, १४ गुण) 5 questions
विभाग ५ : व्याकरण व लेखन (कृती ५, २० गुण) 6 questions

About this paper

This is the actual Maharashtra State Board (MSBSHSE) HSC (Class 12) Marathi (02) – युवकभारती board paper of the February–March 2026 examination. The paper code printed on the activity sheet (कृतिपत्रिका) is J-109; the header reads Day 03, 2026 II 12, 11.00 a.m., i.e. it was written on 12 February 2026. Marathi (Yuvakbharati) is a language paper common to all streams — Science, Commerce and Arts — so the same paper is written by every HSC student who takes Marathi.Source: the Maharashtra State Board's printed question paper (paper code J-109). The model answers are original Doubtly answers written in Marathi, not an official board answer key.

Paper pattern

Maximum marks 80, time 3 hours, 12 pages, five sections. विभाग १ गद्य (20 marks : two textbook passages of 8 marks each with a स्वमत choice, and an unseen passage of 4 marks). विभाग २ पद्य (16 marks : activities on ‘रे थांब जरा आषाढघना’, meaning of four lines, and either काव्यसौंदर्य or रसग्रहण). विभाग ३ साहित्यप्रकार – कथा (10 marks : a passage on the कथा form, then any two of four activities on the prescribed stories). विभाग ४ उपयोजित मराठी (14 marks : any two short answers and any two 5-mark answers on मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल and वृत्तलेख). विभाग ५ व्याकरण व लेखन (20 marks : 10 one-mark grammar items — वाक्यप्रकार, समास, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार — and one essay of 200–250 words from five topics). Diagrams and boxes in the comprehension activities must be drawn neatly in pen or pencil, as the instructions say.

How to use it

Write the paper by hand in one 3-hour sitting, drawing the boxes and arrows as given, then compare with the model answers. Where the paper offers a choice (स्वमत ‘किंवा’, ‘कोणत्याही दोन’), the board needs only the required number of answers; we give model answers for more than one option where useful. For स्वमत, अभिव्यक्ती and the essay, our answer is one sample — any well-argued, correctly spelt answer of similar length is acceptable.

FAQs

Is the HSC Marathi paper the same for Science, Commerce and Arts?

Yes. Marathi (Yuvakbharati) is a language paper and the same question paper is used for all streams.

Why is it called the March 2026 paper if it was held on 12 February?

The board calls its main annual examination the February–March 2026 examination; the Marathi paper was held on 12 February 2026 as part of it.

Are these the board's official answers?

No. The questions are the board's own, but every answer here is a Doubtly model answer written to show how a good student would answer. The board does not publish its moderator answer key.

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions. Sections: A (MCQ and very short answers), B (short answers, attempt any 8 of 12), C (attempt any 8 of 12), D (long answers with choice).

विभाग १ : गद्य (कृती १, २० गुण)

  1. कृती १. (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)

    (१) कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे – (२)
    [आकृती : एका रेषेतून दोन बाण निघून (य) आणि (र) अशा दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]

    (२) जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र – (२)
    [आकृती : एका रेषेतून दोन बाण निघून (य) आणि (र) अशा दोन रिकाम्या चौकटींकडे जातात.]

    कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत?

    वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, तर तातडीचा भाग म्हणून कधी तरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल, तर वाहनाचा उपयोग होईल; पण सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत.

    (३) स्वमत अभिव्यक्ती – (४)
    ‘जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो,’ – हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

    किंवा

    ‘मनाचा ब्रेक - उत्तम ब्रेक’ याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा.

    8 marks See answer →
  2. कृती १. (आ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)

    (१) प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत – (२)
    (य) ..................
    (र) ..................

    (२) चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य – (२)
    (य) ..................
    (र) ..................

    मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो. तिथेही या चित्रांचे स्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार पाचसात वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली! हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री दहानंतर मी समोर ड्रॉइंगपेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याच बरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं.

    (३) स्वमत अभिव्यक्ती – (४)
    लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्ये विरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

    किंवा

    ‘समाजातील अनिष्ट रूढी’ याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

    8 marks See answer →
  3. कृती १. (इ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४ गुण)

    (१) जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख : (२)
    (य) [ ]
    (र) [ ]

    छोटेसे का होईना पण स्वत:चे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. पण स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड प्लॉटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसलो.

    अर्थात हे भाग्य असेतसे आले नव्हते. बंगल्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी मी निरनिराळ्या ठिकाणांहून इतकी कर्जे काढली होती की, जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे वा कॉम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने कर्जाचे व हप्त्यांचे ठरले होते. असे असूनही, आणखी एक कर्ज काढून मी दणक्यात वास्तुशांत केली अन् बंगल्यात राहायला गेलो. आसपास थोडीफार वस्ती होऊ घातली असली तरी माझा बंगला त्या माळरानावर ओकाबोकाच वाटत होता. बंगल्याच्या आवारातच काय, पण बाहेर एकही झाड नव्हते ना झुडूप होते. सोयी गैरसोयीही बऱ्याच होत्या, तरी सुद्धा ..... इट वॉज माय स्वीट ..... स्वीट होम!

    — अविनाश हळबे.

    (२) लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले – (२)
    कारण ..................

    4 marks See answer →

विभाग २ : पद्य (कृती २, १६ गुण)

  1. कृती २. (अ) खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (८ गुण)

    (१) चौकटी पूर्ण करा – (२)
    आषाढघनाच्या पदविन्यासखुणा –
    (य) [ ]
    (र) [ ]

    (२) कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नांवे – (२)
    (य) [ ]    (र) [ ]

    रे थांब जरा आषाढघना
    बघुं दे दिठि भरुन तुझी करुणा
        कोमल पाचूंचीं हीं शेतें
        प्रवाळमातीमधलीं औतें
        इंद्रनीळ वेलूंचीं बेटें
    या तुझ्याच पदविन्यासखुणा
        रोमांचित ही गंध - केतकी
        फुटे फुलीं हो सोनचंपकी
        लाजुन या जाईच्या लेकी
    तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
        उघड गगन, कर घडिभर आसर
        आणि खुलें कर वासरमणि - घर
        वाहूं दे या तव किमयेवर
    कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा
        कणस भरूं दे जिवस दुधानें
        देठ फुलांचा अरळ मधानें
        कंठ खगांचा मधु गानानें
    आणीत शहारा तृणपर्णां
        आश्लेषांच्या तुषारस्नानीं
        भिउन पिसोळीं थव्याथव्यांनी
        रत्नकळा उधळित माध्यान्हीं
    न्हाणोत इंद्रवर्णांत वना
        काळोखाचीं पीत आंसवें
        पलवींत उमलतां काजवे
        करुं दे मज हितगूज त्यांसवें
    निरखीत जळांतिल विधुवदना

    (टीप : कृतिपत्रिकेत ‘पलवींत’ असे छापले आहे; ते जसेच्या तसे ठेवले आहे. अर्थ : पालवीत/पल्लवांत.)

    (३) अभिव्यक्ती : (४)
    आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा.

    8 marks See answer →
  2. (आ) खालील ओळींचा अर्थ लिहा : (४ गुण)

    कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
    मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
    राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
    हे कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!

    4 marks See answer →
  3. (इ) खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (४ गुण)

    काव्यसौंदर्य :

    समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
    तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
    हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
    ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
    आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.

    या ओळींतून सूचित होणारे भावसौंदर्य उलगडून दाखवा.

    किंवा

    रसग्रहण :

    पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
    अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
    स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
    नि आज नखशिखांत तू .... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी !

    वरील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

    4 marks See answer →

विभाग ३ : साहित्यप्रकार – कथा (कृती ३, १० गुण)

  1. कृती ३. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (४ गुण)

    (अ) (१) एका वाक्यात उत्तरे लिहा :
    (य) प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथालेखनामागील हेतू लिहा. (१)
    (र) कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. (१)

    प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या.

    कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते.

    थोडक्यात सांगायचे तर ....... कथा म्हणजे ........ ‘एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.’

    अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते.

    (२) ‘कथा’-व्याख्या लिहा. (२)

    4 marks See answer →
  2. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (६ गुण)

    (य) अनुचे स्वभावचित्र थोडक्यात रेखाटा.
    (र) बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा.
    (ल) डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अनुने सांगितलेला फरक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
    (व) ‘गढी’ या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.

    6 marks See answer →

विभाग ४ : उपयोजित मराठी (कृती ४, १४ गुण)

  1. कृती ४. (अ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (४ गुण)

    (१) मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा.
    (२) माहितीपत्रकाची गरज लिहा.
    (३) अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा.
    (४) वृत्तलेख म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.

    4 marks See answer →
  2. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१० गुण)

    (१) खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचे स्वरूप’ विशद करा.
    मुलाखत म्हणजे ......... मुलाखतीचे विविधांगी स्वरूप ........ मुलाखतीचे विविध प्रकार .......... साधारण ते असाधारण व्यक्ती ............. आगळे वेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व.

    5 marks See answer →
  3. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१० गुण)

    (२) खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना लिहा :
    माहितीला प्राधान्य ........... उपयुक्तता ........... वेगळेपण ........... आकर्षक मांडणी ........... भाषाशैली.

    5 marks See answer →
  4. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१० गुण)

    (३) खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये विशद करा :
    वस्तुनिष्ठता ........... विश्वसनीयता ............ सोपेपणा ............ शब्दमर्यादा ............. नि:पक्षपातीपणा.

    5 marks See answer →
  5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (१० गुण)

    (४) खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत लिहा :
    वृत्त किंवा बातमी ........... व्यक्तिगत अनुभव ........... भेटीगाठी ........... मुलाखती ........... निरीक्षणे.

    5 marks See answer →

विभाग ५ : व्याकरण व लेखन (कृती ५, २० गुण)

  1. कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)

    (१) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
    ही इमारत खूपच उंच आहे.
    वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा :
    (१) ही इमारत काही कमी उंच नाही.
    (२) ही इमारत किती उंच आहे.
    (३) किती लहान आहे ही इमारत.
    (४) बापरे! केवढी उंच आहे ही इमारत!

    (र) सूचनेप्रमाणे सोडवा : (१)
    तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. (नकारार्थी वाक्य करा.)

    2 marks See answer →
  2. कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)

    (२) योग्य पर्याय निवडा :
    (य) ‘गोपाल’ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. (१)
    (१) अव्ययीभाव समास
    (२) द्वंद्व समास
    (३) बहुव्रीही समास
    (४) तत्पुरुष समास

    (र) ‘यथाशक्ती’ या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. (१)

    2 marks See answer →
  3. कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)

    (३) (य) योग्य पर्याय निवडा : (१)
    दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला.
    या वाक्यातील प्रयोग ओळखा :
    (१) कर्तरी प्रयोग
    (२) कर्मणी प्रयोग
    (३) भावे प्रयोग
    (४) यांपैकी नाही

    (र) कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा : (१)
    (१) सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात.
    (२) शेतकऱ्यांनी फुलांची रोपे लावली.
    (३) आज लवकर सांजावले.
    (४) त्याने कपाटात पुस्तक ठेवले.

    2 marks See answer →
  4. कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)

    (४) (य) योग्य पर्याय निवडा : (१)

    तदितर खग भेणे वेगळाले पळाले ।
    उपवन - जल - केली जे कराया मिळाले ॥
    स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो ।
    कठिण समय येता कोण कामास येतो?

    वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा :
    (१) अतिशयोक्ती
    (२) अनन्वय
    (३) अपन्हुती
    (४) अर्थान्तरन्यास

    (र) ‘आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी’ या वाक्यातील उपमान ओळखा. (१)

    2 marks See answer →
  5. कृती ५. (अ) सूचनेनुसार कृती करा : (१० गुण) (व्याकरण घटक व वाक्प्रचार)

    (५) (य) ‘साखरझोपेत असणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा : (१)
    (१) पहाटेच्या गाढ निद्रेत असणे.
    (२) दिवसा उजेडी झोपणे.
    (३) साखर खाऊन झोपणे.
    (४) दिवा स्वप्न पाहणे.

    (र) ‘साखरझोपेत असणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. (१)

    2 marks See answer →
  6. (आ) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा : (१० गुण)

    (१) रानफुलांचे सौंदर्य
    (२) माझा आवडता साहित्यिक
    (३) ग्रंथालयाचे मनोगत
    (४) समुद्र आटला तर ......
    (५) स्त्री-पुरुष समानता : काळाची गरज

    10 marks See answer →