महाराष्ट्र राज्य मंडळाची अधिकृत प्रश्नपत्रिका N 706, जुलै 2025 (परीक्षा दिनांक 3 जुलै 2025), विज्ञान आणि तंत्रज्ञान (72) भाग 1, मराठी माध्यम. प्रश्न मंडळाने छापल्याप्रमाणे (स्रोत: mahahsscboard.in); उत्तरे Doubtly ने लिहिली आहेत. हीच प्रश्नपत्रिका इंग्रजी माध्यमात येथे आहे: इंग्रजी माध्यमातील प्रश्नपत्रिका (N 705).
Maharashtra SSC Science and Technology Part 1 Board Paper July 2025, Marathi Medium (विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ जुलै 2025)
Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.
Sections
| प्रश्न 1 (अ) योग्य पर्याय निवडा (5 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 1 (ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (5 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण) | 3 Q | |
| प्रश्न 2 (ब) खालील प्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण) | 5 Q | |
| प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही पाच) (15 गुण) | 8 Q | |
| प्रश्न 4 खालील कोणताही एक उपप्रश्न सोडवा (5 गुण) | 2 Q |
Chapters covered
Instructions
सूचना :
(i) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
(ii) गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
(iii) प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
(iv) प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(अ)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
(v) आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा.
(vi) प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावर करावी.
प्रश्न 1 (अ) योग्य पर्याय निवडा (5 गुण)
-
प्रश्न 1 (अ)(i) अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ................... मध्ये आहे.
- (अ) गण 2
- (ब) गण 16
- (क) आवर्त 2
- (ड) डी-खंड
-
प्रश्न 1 (अ)(ii) अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला ................... असे म्हणतात.
- (अ) क्षपण
- (ब) ऑक्सिडीकरण
- (क) विस्थापन
- (ड) विघटन
-
प्रश्न 1 (अ)(iii) ................... हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात.
- (अ) विद्युतचलित्र
- (ब) गॅल्व्हॅनोमीटर
- (क) विद्युतजनित्र
- (ड) व्होल्टमीटर
-
प्रश्न 1 (अ)(iv) प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे ................... असे म्हणतात.
- (अ) परावर्तन
- (ब) अपस्करण
- (क) अपवर्तन
- (ड) अवशोषण
-
प्रश्न 1 (अ)(v) भूपृष्ठापासून उच्च भ्रमणकक्षेची उंची ................... .
- (अ) = 20,000 km
- (ब) = 27,000 km
- (क) < 30,780 km
- (ड) > 35,780 km
प्रश्न 1 (ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (5 गुण)
-
प्रश्न 1 (ब)(i) वेगळा घटक ओळखा :
वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र -
प्रश्न 1 (ब)(ii) सहसंबंध पूर्ण करा :
तांबडा किरण तरंगलांबी जवळपास : 700 nm : : जांभळा किरण तरंगलांबी जवळपास : ............. -
प्रश्न 1 (ब)(iii) योग्य जोडी जुळवा :
स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’ दूरदृष्टिता (अ) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात.
(ब) जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात.
(क) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. -
प्रश्न 1 (ब)(iv) इलेक्ट्रॉन संरूपण लिहा :
ॲल्युमिनिअम -
प्रश्न 1 (ब)(v) चूक की बरोबर ते लिहा :
चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे.
प्रश्न 2 (अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतेही दोन) (4 गुण)
-
प्रश्न 2 (अ)(i) सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.
-
प्रश्न 2 (अ)(ii) डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा स्पष्टपणे पाहू शकत नाही.
-
प्रश्न 2 (अ)(iii) विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
प्रश्न 2 (ब) खालील प्रश्न सोडवा (कोणतेही तीन) (6 गुण)
-
प्रश्न 2 (ब)(i) जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती ?
-
प्रश्न 2 (ब)(ii) एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(अ) या मूलद्रव्याचा अणुअंक किती ?
(आ) हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे ? -
प्रश्न 2 (ब)(iii) खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा आणि उत्पादितांची नांवे लिहा :
\(\mathrm{CuSO_{4(aq)} + Fe_{(s)} \longrightarrow ......... + .........}\) -
प्रश्न 2 (ब)(iv) विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लिहून त्याचे SI एकक व CGS एकक लिहा.
-
प्रश्न 2 (ब)(v) मिथेन \(\mathrm{(CH_4)}\) व इथेन \(\mathrm{(C_2H_6)}\) चे इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना काढा.
प्रश्न 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही पाच) (15 गुण)
-
प्रश्न 3 (i) ‘मुक्तिवेग’ ही संकल्पना स्पष्ट करा.
-
प्रश्न 3 (ii) आधुनिक आवर्तसारणीची खालील माहिती लिहा :
(अ) आधुनिक आवर्ती नियम लिहा.
(ब) आवर्तने व गण यांची संख्या लिहा.
(क) हॅलोजन गणातील मूलद्रव्यांची संयुजा लिहा. -
प्रश्न 3 (iii) खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहेत की ऊष्मादायी आहेत ते ओळखा :
(अ) \(\mathrm{HCl + NaOH \longrightarrow NaCl + H_2O}\) + उष्णता
(ब) \(\mathrm{2KClO_{3(s)} \xrightarrow{\Delta} 2KCl_{(s)} + 3O_2\uparrow}\)
(क) \(\mathrm{CaO + H_2O \longrightarrow Ca(OH)_2}\) + उष्णता -
प्रश्न 3 (iv) दिलेल्या आकृत्या अ, ब, क ओळखा व त्यांचे उपयोग लिहा :
(आकृती: (अ) दोन्ही टोकांना धातूची टोपणे असलेल्या काचेच्या नळीसारख्या दोन कार्ट्रिज वितळतारा (फ्यूज); (ब) वर व खाली जोडणीचे स्क्रू आणि मध्ये तीन खटके (लिव्हर) असलेले, एकमेकांना जोडलेले तीन पोलचे छोटे स्विचसारखे उपकरण (MCB); (क) काटा व वक्र मापपट्टी असलेले, पेटीत बसवलेले प्रयोगशाळेतील मीटर; त्याचा काटा मापपट्टीच्या मध्यभागी (शून्यावर) उभा आहे आणि खालच्या भागात जोडणीची टोके व एक बटण आहे.)
-
प्रश्न 3 (v) 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20°C पासून 100°C पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल ?
[c = 1 kcal/kg°C] -
प्रश्न 3 (vi) भिंगासाठी वापरले जाणारे कार्टेशिअन चिन्ह संकेत लिहा.
-
प्रश्न 3 (vii) खालील तक्ता पूर्ण करा :
(आकृती: तीन ओळींत प्रत्येकी तीन चौकटी आडव्या रेषांनी जोडल्या आहेत. वरची ओळ: ‘IRNSS’ – [रिकामी] – [रिकामी]. मधली ओळ: [रिकामी] – ‘हवामान उपग्रह’ – [रिकामी]. खालची ओळ: [रिकामी] – [रिकामी] – ‘पृथ्वी निरीक्षण’. वरच्या ओळीची मधली चौकट, ‘हवामान उपग्रह’ ही मधली चौकट आणि खालच्या ओळीची मधली चौकट उभ्या रेषांनी जोडलेल्या आहेत.)
-
प्रश्न 3 (viii) खालील अभिक्रियांसाठी रासायनिक समीकरणे लिहा :
(अ) थर्मिट अभिक्रिया
(ब) मॅग्नेशिअम फितीचे हवेतील ज्वलन
(क) लोखंडाचा खिळा/चुरा कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकला.
प्रश्न 4 खालील कोणताही एक उपप्रश्न सोडवा (5 गुण)
-
प्रश्न 4 (i) इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान आकृतीसह स्पष्ट करा.
-
प्रश्न 4 (ii) खालील सारणी पूर्ण करा :
अ. न. कार्बन अणुंची सरलशृंखला रेणुसूत्र नाव 1. C \(\mathrm{CH_4}\) ............ 2. C–C ............ ईथेन 3. C–C–C \(\mathrm{C_3H_8}\) ............ 4. C–C–C–C ............ ब्यूटेन 5. C–C–C–C–C \(\mathrm{C_5H_{12}}\) ............ 6. C–C–C–C–C–C ............ हेक्झेन 7. C–C–C–C–C–C–C ............ हेप्टेन 8. C–C–C–C–C–C–C–C \(\mathrm{C_8H_{18}}\) ............ 9. C–C–C–C–C–C–C–C–C ............ नोनेन 10. C–C–C–C–C–C–C–C–C–C ............ डीकेन