Skip to content
doubtly

Maharashtra SSC Marathi (First Language) Board Paper July 2024

Written board papers, 40 marks and 2 hours each: Science & Technology Part 1 and 2, Algebra, Geometry and more.

2024, July 180 minutes 80 marks Save WhatsApp

Sections

विभाग-1 : गद्य 3 questions
विभाग-2 : पद्य 3 questions
विभाग-3 : स्थूलवाचन 3 questions
विभाग-4 : भाषाभ्यास 7 questions
विभाग-5 : उपयोजित लेखन 8 questions

Chapters covered

Instructions

Solve on paper with a timer, then check against the solutions.

विभाग-1 : गद्य

  1. 1. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    (1) खालील आकृती पूर्ण करा : (2)

    अरुणिमाला अमान्य असणाऱ्या गोष्टी → [ ] , [ ] , [ ] , [ ]

    आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला.... एक सांगू ? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी अश्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण Fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे..... जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हाला दिलसा. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या ‘डेथ झोन’मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.... आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. ‘माझा दिवस’ अखेर आला होता.... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर ‘एव्हरेस्ट’ मी सर केले होते!

    गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं.

    (2) खालील चौकटी पूर्ण करा : (2)

    गिर्यारोहणाने अरुणिमाला मिळालेले धडे → [ ] , [ ] , [ ] , [ ]

    (3) स्वमत : (3)
    ‘कर्तृत्ववान माणूस नशिबावर अवलंबून राहत नाही’ याविषयी तुमचे मत लिहा.

    7 marks See answer →
  2. 1. (आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (7 गुण)

    (1) चौकटी पूर्ण करा : (2)

    आगळची वैशिष्ट्ये → [ ] , [ ] , [ ] , [ ]

    आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या. त्यांची शहानिशा व्हायची न् मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो.

    (2) एका शब्दात उत्तरे लिहा : (2)

    (i) वर्तमानपत्राची संपादक............
    (ii) वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच............

    (3) स्वमत : (3)
    ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं,’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा व त्याविषयी तुमचे मत लिहा.

    7 marks See answer →
  3. 1. (इ) अपठित गद्य – उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. (4 गुण)

    (1) आकृतिबंध पूर्ण करा : (2)

    (i) अधिकारवाणीने जागा होणारा – [ ]
    (ii) राष्ट्राचे प्रमुख असणारे – [ ]

    आपण कोणतेही कार्य करताना ‘मी’ सोडून सर्वांनी हे करावं अशी भूमिका असते. पण आमचं नेमकं चुकत कुठे ? इथेच तर! कारण ‘मी’ स्वतःला कधी गृहीत न धरल्याने माझ्यातील अधिकारवाणीचा अहंभाव जागा होतो. त्यामुळे केवळ हे काम माझे नाहीच ते इतरांनी करायचे आहे अशीच माझ्या मनाची भूमिका होते. पण या भूमिकेत जे कोणी असतात त्यांनी एक ओळखायला हवे की स्वतःकडे ध्येय नसताना इतरांकडून कोणतीही कृती करून घ्यायची तेव्हा आमची अवस्था “तुझं आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी” अशीच होणार. आजपर्यंत डॉ. कलाम सर यांनी नेमकं हेच जाणलेलं होतं. आपण तसे एका राष्ट्राचे राष्ट्रपती आहोत, म्हणून केवळ अधिकारवाणीने जगत राहिलो तर, तर काहीच साध्य होणार नाही.

    संदर्भ—
    डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
    चिरंतन प्रेरणा
    लेखक — श्री. के. आर. पाटील
    प्रकाशक — ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूर

    (2) योग्य पर्याय निवडा : (2)

    (i) अहंभावी माणसाजवळ नसणारी गोष्ट –
    (अ) मीपणा (आ) ध्येय (इ) अधिकारवाणी (ई) साध्य

    (ii) डॉ. कलाम यांनी जाणलेली गोष्ट –
    (अ) अधिकारवाणी गाजवणं (आ) इतरांकडून काम करून घेणं (इ) ध्येयनिष्ठ बनून काम करणे (ई) कामाकडं दुर्लक्ष करणं

    4 marks See answer →

विभाग-2 : पद्य

  1. 2. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा : (8 गुण)

    (1) आकृती पूर्ण करा – (2)

    वस्तूंजवळ नसलेल्या मानवी बाबी → [ ] , [ ]

    वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
    जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
    वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
    असल्यासारखे वागलो तर वस्तू
    प्रचंड सुखावतात.

    वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
    तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
    वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
    त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
    निष्कासित न होण्याची हमी द्या.

    वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
    हे हातांना लक्षात ठेवायला सांग.
    वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
    त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
    नंतरच्या काळातही.

    आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
    हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
    कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
    शाबूत ठेवावा.

    (2) कारणे लिहा : (2)

    (i) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण............
    (ii) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण............

    (3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा : (2)
    आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
    हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
    कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
    शाबूत ठेवावा.

    (4) काव्यसौंदर्य : (2)
    ‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ या बाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.

    8 marks See answer →
  2. 2. (आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा : (4 गुण)

    ‘आकाशी झेप घे रे’ किंवा ‘खोद आणखी थोडेसे’

    कृती‘आकाशी झेप घे रे’‘खोद आणखी थोडेसे’गुण
    (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री –........................1
    (ii) कवितेचा विषय –........................1
    (iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे........................2
    4 marks See answer →
  3. 2. (इ) रसग्रहण : (4 गुण)

    खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा :

    माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
    एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
    जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.

    4 marks See answer →

विभाग-3 : स्थूलवाचन

  1. 3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (6 गुण)

    (1) टीप लिहा : व्युत्पत्ती कोशाचे कार्य

    3 marks See answer →
  2. (2) ‘माणसे पेरा। माणुसकी उगवेल’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

    3 marks See answer →
  3. (3) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.

    3 marks See answer →

विभाग-4 : भाषाभ्यास

  1. 4. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :

    (1) समास : खालील तक्ता पूर्ण करा : (2)

    सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
    ............चार किंवा पाच............
    नीलकमल........................
    2 marks See answer →
  2. 4. (अ) (2) शब्दसिद्धी : खालील तक्ता पूर्ण करा : (2)

    (हुरहुर, गुलामगिरी, उपसंपादक, दुकानदार)

    उपसर्गघटितप्रत्ययघटितअभ्यस्त
    ....................................
    ....................................
    2 marks See answer →
  3. 4. (अ) (3) वाक्प्रचार : खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा : (4)

    (i) पित्त खवळणे—
    (ii) पारख करणे—
    (iii) खस्ता खाणे—
    (iv) आनंद गगनात न मावणे—

    4 marks See answer →
  4. 4. (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :

    (1) शब्दसंपत्ती :

    (1) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा : (1)
    (i) पुरामुळे नुकसान झालेले लोक – [ ]
    (ii) खूप दानधर्म करणारा – [ ]

    (2) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा : (1)
    (i) आकाश – [ ]
    (ii) हर्ष – [ ]

    (3) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा : (1)
    (i) आदर × ............
    (ii) सावध × ............

    (4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा : (1)
    राजमानस – [राज आणि मानस हे शब्द वगळून]

    4 marks See answer →
  5. 4. (आ) (2) लेखननियमांनुसार लेखन : अचूक शब्द ओळखा. (कोणतेही चार शब्द सोडवा.) (2)

    (i) हनुवटी, हनूवटी, हनुवटि, हनूवटि
    (ii) किर्ती, किर्ति, कीर्ति, कीर्ती
    (iii) माहिती, माहीती, माहिति, माहीति
    (iv) आशिर्वाद, आर्शिवाद, आर्शीवाद, आशीर्वाद
    (v) सूरक्षीत, सूरक्षित, सुरक्षित, सुरक्षीत
    (vi) दीपावली, दिपावली, दीपावलि, दिपावलि

    2 marks See answer →
  6. 4. (आ) (3) विरामचिन्हे : खालील वाक्यातील विरामचिन्हांची नावे लिहा : (1)

    जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले ?

    विरामचिन्हेनावे
    ,............
    ?............
  7. 4. (आ) (4) पारिभाषिक शब्द : खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा : (1)

    (i) Bio-data – [ ]
    (ii) Unit – [ ]

विभाग-5 : उपयोजित लेखन

  1. 5. (अ) खालील कृती सोडवा : (6 गुण)

    (1) पत्रलेखन : खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

    आदर्श विद्यालय, अहमदनगर
    स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम
    दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 ऑक्टोबर
    – शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता –
    विद्यालयात ‘स्वच्छतादूत’ म्हणून काम
    केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
    सत्कार समारंभ – दि. 7 ऑक्टोबर
    दु. 4.00
    संपर्क – विभाग प्रमुख, स्वच्छता सप्ताह उपक्रम
    adarshvidya24@gmail.com

    अमर/अमृता शाह — विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

    (i) विभागप्रमुखांना स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.

    किंवा

    (ii) स्वच्छतादूतांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

    6 marks See answer →
  2. 5. (अ) (2) सारांशलेखन : (6 गुण) (पत्रलेखनाऐवजी पर्याय)

    विभाग-1 : गद्य (इ) [प्र. क्र. 1 (इ)] मधील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

    आपण कोणतेही कार्य करताना ‘मी’ सोडून सर्वांनी हे करावं अशी भूमिका असते. पण आमचं नेमकं चुकत कुठे ? इथेच तर! कारण ‘मी’ स्वतःला कधी गृहीत न धरल्याने माझ्यातील अधिकारवाणीचा अहंभाव जागा होतो. त्यामुळे केवळ हे काम माझे नाहीच ते इतरांनी करायचे आहे अशीच माझ्या मनाची भूमिका होते. पण या भूमिकेत जे कोणी असतात त्यांनी एक ओळखायला हवे की स्वतःकडे ध्येय नसताना इतरांकडून कोणतीही कृती करून घ्यायची तेव्हा आमची अवस्था “तुझं आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी” अशीच होणार. आजपर्यंत डॉ. कलाम सर यांनी नेमकं हेच जाणलेलं होतं. आपण तसे एका राष्ट्राचे राष्ट्रपती आहोत, म्हणून केवळ अधिकारवाणीने जगत राहिलो तर, तर काहीच साध्य होणार नाही.

    संदर्भ—
    डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
    चिरंतन प्रेरणा
    लेखक — श्री. के. आर. पाटील
    प्रकाशक — ज्ञानसंवर्धन प्रकाशन, कोल्हापूर

    6 marks See answer →
  3. 5. (आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा : (10 गुण)

    (1) जाहिरातलेखन : खालील मुद्द्यांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा.

    खेळाच्या साहित्याचे दुकान | पत्ता | साहित्यावर विशेष सवलत | दुकानाची वेळ | दुकानाची वैशिष्ट्ये | साप्ताहिक सुट्टी

    5 marks See answer →
  4. 5. (आ) (2) बातमीलेखन : (5 गुण)

    26 जानेवारी रोजी सरस्वती विद्यामंदिर, जळगाव या शाळेत ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करण्यात आला. या समारंभाची बातमी तयार करा.

    5 marks See answer →
  5. 5. (आ) (3) कथालेखन : (5 गुण) खाली दिलेल्या मुद्द्यांवरून आकर्षक कथा लिहा :

    शेतकऱ्याची मुले – अजित व सुजित – अजित मेहनती – सुजित आळशी – सुजितला वारंवार मेहनतीचा सल्ला – सुजितने न ऐकणे – शेतकऱ्याचे परगावी जाणे – भरपूर काम करण्याचे आदेश मुलांना देणे – अजित यशस्वी – सुजित अयशस्वी –

    5 marks See answer →
  6. 5. (इ) खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा : (8 गुण)

    (1) प्रसंगलेखन :

    आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत अंतिम
    सामन्यात तुमच्या शाळेचा संघ विजयी.
    मा. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या हस्ते सत्कार.
    [कौतुकाचा वर्षाव] [आनंदोत्सव]
    दि. 15 डिसेंबर
    स्थळ – दयानंद सभागृह, कोपरगाव
    वेळ – सकाळी 11.00

    वरील प्रसंगी विजयी संघातर्फे तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

    8 marks See answer →
  7. 5. (इ) (2) आत्मकथन : खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

    घटक : शाळेचा घंटा — मुद्दे : महत्त्व/उपयोग, निर्मिती, प्रकार, खंत

    8 marks See answer →
  8. 5. (इ) (3) वैचारिक : (8 गुण)

    ‘ग्रंथ माझे गुरु’ या विषयावर खालील मुद्द्यांना अनुसरून तुमचे विचार लिहा.

    ग्रंथाचे महत्त्व | ग्रंथाचे प्रकार | ग्रंथ व गुरु साम्य | वाचनाचे महत्त्व

    8 marks See answer →